AJ

Where to find AJ online


Where to buy in print


Books

कालचक्र Time Matrix
Price: Free! Words: 4,570. Language: Marathi. Published: November 19, 2014. Categories: Fiction » Inspirational
आपला वर्तमान हा मुक्त नाही. प्रत्येक वेळी तो कसल्याश्या प्रभावाखाली काम करतो. त्याची शुध्द हरपली. आणि अशाच प्रभावित आणि शुध्द हरपलेल्या वर्तमान काळास आपण सामोरे जात असल्यामुळे आपण प्रत्येक वेळी प्रतिक्रियात्मक पर्याय निवडले. काळाचे अद्भूत चक्र समजताच आपण त्या काळाच्या भोवऱ्यातून सहज आपली सुटका करून घेवू शकू. आणि मग आपल्याला प्रगतीची नवीन क्षिताजे उघडतील. आपला काळ मुक्त संचार करू लागेल.
या विश्वाचे रहस्य Secret of the Universe
Price: Free! Words: 4,750. Language: Marathi. Published: November 16, 2014. Categories: Fiction » Inspirational
या विश्वाचे रहस्य काय ते कळायला हवे. जगत बाहेरून आत न पाहता आतून बाहेर पाहायला हवे. आपल्या इंद्रियांना गोचर होत असलेले अनुभव विश्व म्हणजे सत्य नव्हे. संपूर्ण मानवता, विश्वाच्या पसाऱ्याच्या तुलनेत एक चिमुटभर धूळ नव्हे काय? या इंद्रियांच्या माध्यमातून आपण भोगत असलेल्या सुख दुःखांच्या पलीकडे पाहता यायला हवे.
चांगले पहा See Good Feel Good
Price: Free! Words: 4,480. Language: Marathi. Published: October 9, 2014. Categories: Fiction » Inspirational
बाहेर जे दिसते आहे ते तुमच्या अंतरंगाचेच प्रतिबिंब आहे. बाह्य बदलण्यासाठी अंतरंग बदलावा लागेल. जीवन हा आरसा आहे तो आपले रूपच आपल्याला दाखवतो. चांगले वाढवण्यासाठी जीवनात काय चांगले आहे ते पहावे लागेल.
अनमोल खजिना
Price: Free! Words: 6,980. Language: Marathi. Published: September 29, 2014. Categories: Fiction » Inspirational, Fiction » Children’s books » Fiction
हा एवढा मोठा खजिना आहे की तो अनेक पिढ्यांना पुरेल. जो योग्यता सिध्द करेल त्यालाच हा मिळेल. तोच राजा होईल जो या १० वचनांचा अर्थ शोधेल. ही १० गूढ सत्ये आहेत. जी फार पुरातन काळापासून चालत आली आहेत. आणि ही १० सत्ये शोधताना तुम्ही देखील माझ्या सारखे शहाणे व्हाल. आणि मग हा खजीना तुमचाच असेल.
Happy Now आनंदी आज आत्ता या क्षणी
Price: Free! Words: 4,210. Language: Marathi. Published: September 20, 2014. Categories: Fiction » Inspirational
आनंद दुःख आत मनात आहे. बाहेर नाही. वरवर असे भासते खरे की आनंद दुःख काहीतरी मिळण्यावर न मिळण्यावर अवलंबून आहे पण ते खरे नाही. मन कारण शोधते आनंदी होण्याचे आणि दुःखी होण्याचे. आणि मनच आनंद करते आणि दुःख सुध्दा. आपल्याला सराव करावा लागेल. मनाला सवय घालावी लागेल. चांगले पाहण्याची. प्रत्येक क्षण Happy Now राहण्याची.
आधारवड
Price: Free! Words: 110. Language: Marathi. Published: September 9, 2014. Categories: Fiction » Poetry » Spiritual
(5.00)
आक्कानी आणि वडूआईनी आयुष्यभर आमच्या वर खूप माया केली. मनात सर्वत्र त्यांच्या मायेचा आधारवड विस्तीर्ण पसरलेला आहे. हा आधारवड नीट पहावा, मनात सर्वत्र पसरलेल्या शाखा आणि खोल वर रुजलेल्या पारंब्या नीट न्यहाळाव्या असे वाटू लागले. कविता कधी केली नाही, यमक कधी जुळवले नाही. त्यामुळे याला काव्य म्हणता येणार नाही. या आठवणी आहेत, हे संस्कार आहेत, जे अलगद मनात पसरत गेले आणि हा विस्तीर्ण वटवृक्ष तयार झाला.
का चा शोध (why?)
Price: Free! Words: 5,350. Language: Marathi. Published: August 31, 2014. Categories: Fiction » Inspirational, Fiction » Inspirational
जीवन न संपणाऱ्या अपेक्षांची यादी न राहता, खळाळत वाहणारी नदी असायला हवे. सतत "मी माझे" ची विवंचना न राहता आनंद, समाधानाची मालिका असायला हवे. जीवनाची रहस्ये शोधायला हवीत.“का चा शोध?”घ्यायला हवा. या साडे पाच फुट देहा मागे “मन ” नावाचा विस्वीर्ण समुद्र आहे. आणि त्यात अनेक रहस्य दडलेली आहेत जी आपले बाह्य जीवन घडवत असतात . खरे जीवन तर आत मनातच असते .

AJ's tag cloud